Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यांसाठी ३.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर : - मनोज कोकाटे


 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

वाळकी : - नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नगर तालुक्यातील दशमी गव्हाण - उक्कडगाव - सांडवे रस्त्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून वंचित असणारा दशमी गव्हाण ते उक्कडगाव व उक्कडगाव ते सांडवा रस्ता व्हावा अशी गेल्या अनेक दिवसांपासून या  गावातील ग्रामस्थांची आग्रही मागणी होती. या मागणीची दखल घेऊन सदर बाब खासदार डॉ.सुजय विखे पा. यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सदर बाब गांभीर्याने घेत खासदार विखे यांनी या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ३.५ कोटी रुपयांचा भरीव निधी अखेर मंजूर करून दिला. गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असणारा सदर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागल्यामुळे निश्चितच दशमी गव्हाण, उक्कडगाव, सांडवे या गावातील दळणवळणस चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.

नगर - जामखेड रोड सह चिचोंडी पाटील गटातील अनेक अनेक प्रलंबित विकास कामे खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून मार्गी लागत असून पुढील काळात देखील खा.विखे यांच्याकडून भरीव निधी मंजूर होणार असल्याची माहिती या वेळी कोकाटे यांनी दिली. दशमी गव्हाण - उक्कडगाव - सांडवे रोडसाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल दशमी गव्हाण, उक्कडगाव, सांडवे ग्रामस्थांनी खासदार सुजय विखे यांचे आभार व्यक्त केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या