Ticker

6/Breaking/ticker-posts

सौ.प्रभावती ढाकणे यांनी मानधनाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहायता निधीस

 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

टाकळी मानुर  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भालगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या  प्रतापराव ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना प्रतिबंध उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ हजार रूपयांची मदत करण्यात आली.तहसिलदार शामा वाडकर व नायब तहसिलदार पंकज नेवसे यांच्याकडे पदाधिर्यांनी मादतीचा धनादेश सुपूदॕ केला.

   जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे यांचा २७ एप्रिल रोजी वाढदिवस असतो.दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस त्यांचे समथॕक साजरा करतात मात्र यंदा कोरोना परिस्थितीमुळे कोणाताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही.जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून मिळालेल्या मानधनातून सौ.ढाकणे यांनी ५१ हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.राज्य संकटात असल्याने दानशूरांनी कोरोना प्रतिबंध उपाययोजनांसाठी राज्य शासनास मदत करावी व कोरोनामुळे आथिॕक संकट शासनापुढे असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीत आपला सहभाग नोंदवावा असे त्यांनी सांगितले तसेच तालुक्यातील कोरोनाग्रस्त गरिब कुटूंबांना उपचारासाठी दत्तक घ्यावे.या उपक्रमामुळे अनेक गरजूंना दिलासा मिळेल असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.

  आज सकाळी तहसिल कार्यालयात नगरसेवक बंडू पाटील बोरूडे,दिगंबर गाडे,वैभव दहिफळे,योगेश रासने,इजाज शेख,अभय गांधी,देवा पवार,दीपक बडे,सोमनाथ टेके,अक्रम आतार,संतोष जिरेसाळव काँग्रेसचे नासीर शेख यांनी मदतीचा धनादेश तहसिलदार वाडकर यांच्याकडे सूपूदॕ केला.वाडकर यांनी शासनाला संकटाच्या काळात मदत केल्याबद्दल सौ.ढाकणे व अॕड.प्रताप ढाकणे याःंचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या