लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : असे म्हणतात की एकसारखे दिसणारे जगात सात चेहरे असतात. अनेकदा आपण याचा अनुभवही घेतोच. अगदी सेलिब्रिटीसारखे दिसणारे सर्वसामान्य माणसंही आपण यापूर्वी पाहिली आहेतच. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी शाहरुख खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींप्रमाणे दिसणारे लोक समोर आले आहेत. आता करिष्मा कपुर सारखी हुबेहुब दिसणारी मुलगीही दिसली आहे आणि तेदेखील चक्क पाकिस्तानात! हुबेहुब करिष्मासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे नाव हिना खान असून तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
हिना खानचे इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर ३६ हजारांहून अधिक
फॉलोअर्स आहेत. हिना सातत्याने तिच्या सोशल अकाउंटवर करिष्मा कपूरचे डायलॉग, तिच्या गाण्यांवर व्हिडीओ तयार
करून पोस्ट करत असते. हिनाचा चेहरा करिष्माशी इतका मिळता जुळता आहे की पहिल्यांदा
पाहिल्यावर ती करिष्माच असल्याचे वाटते. हिनाच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचे बोलणेही करिष्मा सारखेच आहेत.
हिनाचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले
आहेत. तिच्या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत. ती अगदी करिष्मा कपूरसारखी
दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिना सांगते की तीदेखील करिष्मा कपूरची मोठी
चाहती आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर करिष्माचे फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्यापासून अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांसारखे दिसणारे
लोक आपण पाहिले आहेत. या लोकांनाही कलाकारांच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत
असते.

0 टिप्पण्या