Ticker

6/Breaking/ticker-posts

जिओचे 150 रुपयांपासून धमाकेदार प्लॅन, विनामूल्य कॉलिंगसह बंपर डेटा

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांना बर्‍याच स्वस्त प्रीपेड प्लॅन सादर करत आहे. वापरकर्त्यांना भुरळ घालण्यासाठी कंपनी कमी किमतीतही अधिक फायदा देत आहे. प्रत्येक ग्राहक अशा स्वस्त प्लॅनचा शोध घेत आहेत, ज्यांना त्यांच्या गरजेनुसार डेटासह विनामूल्य कॉलची सुविधा मिळेल. आम्ही तुम्हाला जिओच्या ढासू प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यात इतर अनेक फायद्यांसह डेटा आणि फ्री कॉलिंग मिळत आहे.

जिओचा 129 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या केवळ 129 रुपयांच्या या प्लॅनची वैधता एक महिना म्हणजेच 28 दिवसांची आहे. इंटरनेट वापरासाठी एकूण 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. यासह देशभरातील कोणत्याही नेटवर्कला अमर्यादित कॉलिंग दिली जात आहे. याशिवाय दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. या व्यतिरिक्त जिओ कोरोना काळात आपल्या ग्राहकांसाठी 84 दिवसांच्या वैधतेसाठी 4 प्लॅन सादर करत आहोत. यामध्ये इंटरनेट वापरापासून ते इतर वैशिष्ट्यांपर्यंत आपण आपल्या आवडीचे कोणतेही प्लॅन निवडू शकता. त्यांची वैधता सुमारे 3 महिने आहे.

555 रुपयांचा प्लॅन

जिओने 555 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दिला आहे. यात आपल्याला दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये आपल्याला 128 जीबी डेटा मिळेल. या योजनेमुळे ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्यात आलीय. याशिवाय जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही देण्यात आलेय.

599 रुपयांचा प्लॅन

599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना दररोज  2 जीबी डेटा प्रदान करते. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यात ग्राहकांना 168 जीबी डेटा मिळतो. 2 जीबी  डेटा संपल्यानंतर, त्याचा वेग कमी होऊन 64 केबीपीएस होतो. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठविण्यासाठी हा वेग पुरेसा आहे. यात 100 एसएमएस देखील विनामूल्य आहेत. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे विनामूल्य लाईव्ह अ‍ॅप्स व्यतिरिक्त, डिस्ने + हॉटस्टारमध्ये 1 वर्षासाठी विनामूल्य प्रवेश देखील देण्यात आलाय.

777 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 777 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यात अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस विनामूल्य मिळतात. यातही जिओ अॅप्सची सबस्क्रिप्शनही देण्यात आलेय.

999 रुपयांचा जिओ प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनची वैधताही 84 दिवसांची आहे. यात ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा देण्यात येतो. अशा परिस्थितीत ग्राहकांना एकूण 252 GB डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना उर्वरित प्लॅनप्रमाणे दररोज 100 एसएमएस, अमर्यादित कॉल आणि जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता मिळेल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या