Ticker

6/Breaking/ticker-posts

सोयाबीनच्या वायदेबाजारावर बंदी घालू नका; शेतकरी संघटनेची मागणी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

काष्टी:- जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा आसल्यामुळे सोयाबीनेचे दर वाढले असले तरी, भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदेबाजारावर बंदी लादू नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. सेबीचे अध्यक्षअजय त्यागी यांना ई- मेल द्वारे  पाठवलेल्या निवेदनाद्वारे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी केली आहे.

      मागील हंगामात निकृष्ठ बियाणे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी १००% नुकसान झाले असले तरी सरासरी ३० ते  ३५% नुकासान झालेले आहे. वाढीव दरामुळे शेतकर्‍यांचा मोठा फायदा होणार नाही फक्त झालेली नुकसान भरून निघेल.

          सोयाबीन प्रक्रिया उद्योग लॉबीकडून सोयाबीनचा वायदे बाजार बंद करण्याचे दडपण सरकार वर येत असले तरी शेतकरी हीत लक्षात घेऊन वायदे बाजारवर बंदी घालने फायदेशीर ठरणार नाही. 

   चीन कडून अमेरिकेतील सोयाबीनला मोठी मागणी आहे. तसेच कोव्हिडच्या पार्श्वभुमीवर, अनेक देशानी आपल्या देशातून निर्यात होणार्‍या तेला वर बंदी घातली आहे किंवा निर्यात शुल्क वाढवले आहे. भारातातील सोयाबीन हे नॉन जी एम असल्यामुळे भारतातील सोया पेंडीला बर्‍याच देशात चांगली म‍गणी आहे. 

     वायदे बाजारावर बंदी घातल्यास कच्चा माल स्वस्तात मिळेल व काही प्रक्रिया उद्योगांना अवाजवी नफा कमवण्याची संधी मिळेल. वायदे बाजार बंद केल्यास सोयाबीनच्या किमती कोसळतील व शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागेल.

       वायदे बाजारामुळे पुढील काही काळातील पिकांचे सर्वसाधारण दर काय रहातील याचा अंदाज उद्योजक व शेतकर्‍यांना येत असतो. शेतकर्‍यांना चांगले दर मिळाल्यास शेतकरी तेलबियांचे अधीक उत्पादन करतील व देश तेबियांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होइल. बंदी घालून भाव पाडल्यास शेतकरी तेलबियांच्या पिकांकडे आकर्षित होणार नाहीत व देशापुढे पामतेल आयात करण्या शिवाय पर्याय राहणार नाही.

       अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेकडे या संभाव्य वायदेबाजार बंदी बाबत भिती व्यक्त केली आहे. दि. २० एप्रिल  रोजी, सेबीचे चेअरमन अजय त्यागी यांना इमेलद्वारे निवेदन पाठवून सोयाबीनच्या वायदेबाजारावर  बंदी न घलण्याची विनंती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या