Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांच्या दैनदिन कामकाजात मोठा बदल

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- जिल्ह्यात वाढत असलेल्या करोनाचा प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व कडक नियमावली मुळे व पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचे करोना पासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्ह्यातील पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात बदल करण्यात आला आहे. पतसंस्थांची अर्थसेवा ही अत्यावश्यक सेवा सदरात येत असल्यामुळे नियमांचे पालन करत पतसंस्था चालू ठेवण्यात येत आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी बदलेल्या वेळे नुसारच आपल्या कार्यालयाचे काम करावे. कामकाजाच्या वेळेतील बदल ३१ मे पर्यंत लागू असेल. त्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेवून कळविण्यात येईल. सर्व संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता असावी यासाठी जिल्हयातील सर्व सहकारी पतसंस्थांनी या नियमांचे तंतोतंत पालन कारण अर्थसेवा द्यावीअसे आवाहन जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड व सहकार भारतीचे अध्यक्ष अॅड. रवींद्र बोरावके यांनी केले आहे.

          पतसंस्थांच्या कामकाजाचे नवे नियम पुढीलप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व पतसंस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत ग्राहक सेवा देतील, शनिवार व रविवार जनता कर्फ्यू मुळे पतसंस्था पुर्णपणे बंद राहतील, पतसंस्थांच्या कर्मचा-यांना ओळखपत्र देण्यात यावेकर्मचा-यांच्या गरजेनुसार संख्येचे नियमन करावे, सर्व पतसंस्था कर्मचा-यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावीशक्य असेल त्या सेवा जास्तीत जास्त डिजीटल माध्यमांचा वापर करुनच कराव्यात, संस्थेत व प्रवेशद्वारात सॅनिटायझरची सोय करावी, सोशल डिस्टन्सींगचे नियमांचे पालन करावेविविध संस्था चालक व सहकारी अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करुन खातेदारठेवीदार व ग्राहकांच्या सोयींचा विचार करुन वेळा ठरविण्यात येत आहे.

          पतसंस्थांच्या दैनदिन कामकाजात केलेल्या बदलाची माहिती जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व तालुका सहाय्यक निबंधक यांना देण्यात आली आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या