Ticker

6/Breaking/ticker-posts

सोने तेजीत ; करोनाची दुसरी लाट, सोन्याची ५० हजारांच्या दिशेने कूच

 





लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणखी बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा, खाटांची मर्यादित संख्या यामुळे दिवसागणिक करोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये मात्र तेजी दिसून आली आहे. आठवडाभरात सोन्याचा भाव आठशे रुपयांनी वधारला आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा भाव ४६५०० रुपयांच्या आसपास होता तर चांदी ६६३०० रुपये होती. आठवडाभरात सोने आणि चांदीमध्ये उलथापालथ दिसून आली.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४७३५० रुपयांवर बंद झाला. त्यात १७५ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७४३२ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो 
चांदिचा भाव ६८६०२ रुपयांवर बंद झाला असून त्यात ६२ रुपयांची वाढ झाली.

Goodreturns  या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५००० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४६००० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०४१० रुपये आहे. त्यात ११० रुपयांची वाढ झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९००० रुपये आहे.

जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेने सोने दरात घसरण होत आहे. चालू वर्षात सोने जवळपास ३५०० रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यात देशात करोनाचा कहर सुरु आहे. दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा अनिश्चित परिस्थितीत दीर्घकालावधीत जोखीममुक्त गुंतवणूक म्हणून सोने एक चांगला पर्याय असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. २०२० मध्ये करोना संकटात सोन्याने २८ टक्के परतावा दिला. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६३०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. तर २०१९ मध्ये सोन्यामधून गुंतवणूकदारांना २५ टक्के परतावा मिळालं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या