लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे
तर कधी तिच्या चित्रपटांमुळे. प्रियांकाने हॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा
उमटवला आहे. भारतीय चित्रपटातील तिच्या भूमिका तर प्रेक्षकांना नेहमीच पसंत पडतात.
तिच्या भूमिकांची आणि त्या भूमिकांना न्याय देण्यासाठी प्रियांकाने घेतलेल्या
मेहनतीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होते. पून्हा एकदा प्रियांकाचा एक जुना
व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती प्रियांकाला ‘बाजीराव
मस्तानी’चित्रपटात मस्तानीची भूमिका का
केली नाही, असं
विचारतेय.
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाशी
निगडित एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा व्हिडीओ एका पुरस्कार
सोहळ्यामधील आहे. त्यावर व्हिडिओत एका व्यक्तीने प्रियांकाला प्रश्न विचारला आहे.
त्या व्यक्तीने म्हटलं, 'जेव्हा तुम्हाला चित्रपटाची कथा
ऐकवली जात होती तेव्हा तुम्ही दिग्दर्शकाला कधी असं नाही म्हंटलं की, दीपिकाची भूमिका तुम्हाला करायची आहे?' त्या
व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देत प्रियांकाने म्हटलं, 'तुम्ही
चित्रपट पाहिलाय? मी काय करणार होते? काशी
आवडली नाही का तुम्हाला? तुम्ही माझं घर पाहायला हवं. ते एक
बाग बनलंय.' खरं तर प्रियांकाच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी
प्रचंड कौतुक केलं होतं. तिच्या घराबाहेर चाहत्यांनी पाठवलेल्या पुष्पगुच्छांची
गर्दी झाली होती.
हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडत्या
चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात बाजीराव पेशव्यांची भूमिका रणवीर सिंहने
साकारली होती तर मस्तानीची भूमिका दीपिका पदुकोणने केली होती. चित्रपटात
प्रियांकाने काशीबाईंची भूमिका साकारली होती ज्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी
होत्या. या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.चित्रपटाने बॉक्स
ऑफिसवर भरपूर कमाई केली होती.
0 टिप्पण्या