Ticker

6/Breaking/ticker-posts

..म्हणून कोरोना इतक्या वेगानं देशात पसरतोय, एम्सच्या संचालकांनी सांगितलं ‘कारण’

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर दिल्लीस्थित  एम्सचे संचालक रण्दीप गुलेरिया यांनी मोठी माहिती दिलीय. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला अनेक घटक कारणीभूत आहेत, परंतु त्यातील दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागली आणि लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे थांबवले. याच काळात विषाणूमध्ये बदल झाला आणि कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला.

 

संसाधने वाढवणेही आवश्यक

गुलेरिया म्हणाले की, संसर्ग होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवर खूप दबाव आहे. रुग्णालयांकडे बेडची संख्या सातत्याने टिकवून ठेवायचं आव्हान आहे. वाढत्या घटनांना सामोरे जाण्यासाठी संसाधने वाढवणेही आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांवर शक्य तितक्या लवकर नियंत्रण आणण्याची गरज आहे. ते म्हणाले की, सध्या देशात बरेच धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आणि विधानसभा निवडणुकादेखील सुरू आहेत. त्यामुळे जीवन मौल्यवान असल्याचं आपल्याला समजून घ्यावे लागेल. आम्ही मर्यादीत कार्यक्षेत्रात इतर गोष्टी करू शकतो जेणेकरून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन केले पाहिजे.

लस दिल्यानं होणार फायदा

एएनआयशी बोलताना रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोणतीही लस आपल्याला 100 टक्के संरक्षण देऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही लस घेतल्यानंतरही आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता आहे, परंतु लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्यामुळे विषाणूचा शरीरावर फार वाईट परिणाम होणार नाही आणि त्या व्यक्तीची स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या