Ticker

6/Breaking/ticker-posts

आयपीएल टीमच्याच हॉटेलमध्ये सट्टेबाज ?, पोलिसांकडून तिघांना अटक

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : आयपीएलचा 14 वा हंगाम नुकताच सुरु झाला आहे. सर्व सामने अटीतटीचे होत असल्यामुळे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबईमध्ये आयपीएल संदर्भातील गुन्हेगारी विश्वातील एक मोठी घडना समोर आली आहे. आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफ़ाश केला आहे. सट्टेबाजी करणाऱ्या तीन आरोपींना एनएम जोशी पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईचा हायफाय परिसर म्हणून ओळख असलेल्या लोअर परळ भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे तिन्ही आरोपी वास्तव्यास होते.

 

मिळालेल्याा माहितीनुसार, मुंबईतल्या लोअर परळ भागात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टेबाजी सुरु होती. या सट्टेबाजीमध्ये तीन जण सामील होते. त्याची माहिती एनएम जोशी पोलिसांना मिळाली. ही माहिती समजताच पोलिसांनी सापळा रचत या तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी ही कारवाई काल (16 एप्रिल) केली होती. पंचतारांकित हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर एका महागड्या खोलीमध्ये हा सट्टेबाजीचा प्रकार सुरु होता.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल 8 मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पोलिसांनी आज (17 एप्रिल) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष बाब म्हणजे हे आरोपी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. नेमक्या त्याच हॉटेलमध्ये आयपीएलची एक टीमसुद्धा थांबली होती, असे सुत्रांनी सांगितले आहे. याबाबत विचारले असता सध्या अटक केलेले आरोपी आणि आयपीएलची टीम हॉटेलमध्ये थांबणे याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर सट्टाबाजार विश्वातील मोठी साखळी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. न्यायालयाने तिन्ही आपोरींना पोलीस कोठडी सुनावल्यामुळे आता आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी होणार आहे. या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या