Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा ; मोदी सरकारने Remdesivir केले स्वस्त.. लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही मोदी सरकारनं दिलासादायक बातमी दिलीय. कोरोनाच्या कोट्यवधी रुग्णांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. खरं तर सरकारने कोरोनाच्या उपचारात उपयुक्त असलेल्या  Remdesivir च्या किमती सुमारे 50 टक्क्यांनी कपात केलीय.

 

 देशातील Remdesivir चे 7 उत्पादक

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात Remdesivir चे सात उत्पादक असून, त्यांची क्षमता दरमहा सुमारे 38.80 लाख युनिट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार औषध निर्मिती विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात असून, औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी सरकार महत्त्वाची पावलं उचलणार

रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील उपलब्धता वाढविण्यासाठी Remdesivir चे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार सर्व पावले उचलत आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच दिवसांत एकूण 6.69 लाख इंजेक्शनच्या शिशी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आल्यात. गौडा यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय.

औषधांची किंमत 5,400 रुपयांवरून 3,500 रुपयांपेक्षा कमी

“Remdesivir च्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांची क्षमता, उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.दुसर्‍या ट्विटमध्ये गौडा म्हणाले, “सरकारच्या हस्तक्षेपानंतर Remdesivir प्रमुख उत्पादकांनी 15 एप्रिल 2021 पासून स्वेच्छेने त्याची किंमत 5,400 रुपयांवरून 3,500 रुपयांपेक्षा कमी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेय. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या