लाठीच्या प्रसादाऐवजी दंडाची पावती हातात ?
*
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव (जगन्नाथ गोसावी):-कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात दोन दिवसासाठी लावण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलिसांनी शहरासह तालुक्यात बंदोबस्त तैनात केला आहे. पेट्रोलिंगसह जागोजागी फिक्स पॉइंट लावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे व कंपनी चालक पो. कॉ. किशोर शिरसाठ यांनी दिली. या कामी जनतेचे सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. तथापि, कोणीही महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सध्या शेवगाव पोलीस स्टेशनच्या ३० पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक फिक्स पॉईंट व पेट्रोलिंगवर आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारीही रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणीसह दंड आकारणी करत आहेत. पोलिसांकडून कोणालाही शिक्षा व मारझोड नाही.
रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांना व वाहन चालवणाऱ्यांना लाठीच्या प्रसादाऐवजी दंडाची पावती हातात ?
शेवगाव शहरात शिवाजी चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा फिक्स पॉईंट आहे. तर, बोधेगाव पोलीस क्षेत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांचे नेतृत्वाखाली चार पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत तसेच शहर टाकळी पोलीस दूरक्षेत्रात पोलीस नाईक नेताजी मरकड व तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. चापडगाव, अमरापुर, घोटण बीटातही पोलीस बंदोबस्त आहे. शहरासह ग्रामीण भागातही जनतेचे विकेंड लॉकडाऊनला सहकार्य मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पो.ना.बाबासाहेब शेळके, पो.कॉ.बप्पासाहेब धाकतोडे, पो.कॉ.बाळासाहेब नागरगोजे, चालक पो.ना.रवींद्र शेळके आदी पोलिस वाहनातून पेट्रोलिंग करत आहेत.
0 टिप्पण्या