Ticker

6/Breaking/ticker-posts

मनसेकडून शेवगाव पोलिसांना सावलीचे छत्र..! ; पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था

 


लोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :-   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लावलेल्या कडक जमावबंदी आदेशामुळे सध्या पोलिस यंत्रणेवर बंदोबस्ताचा मोठा ताण असून पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. त्यांना किमान दिवसा कडक उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी एसटी बसस्थानक चौकात स्वखर्चाने मंडप टाकून पोलिसांना सावली व पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सध्या शेवगाव पोलीस स्टेशनला ४ अधिकारी व ७४ पोलीस कर्मचारी नेमणुकीस आहेत. या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दैनंदिन कामकाजाबरोबरच शेवगाव शहरासह तालुक्यातील ११० गावांच्या देखरेखीची व नियंत्रणाची जबाबदारी आहे. सद्यपरिस्थितीत १६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते सर्वजण बंदोबस्तावर रुजू झाले आहेत.

सध्या जमावबंदी आदेशामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे तमाम जनतेचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी  बंदोबस्ताच्या निमित्ताने रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने त्यांच्या जीवाची काहिली होते, जीव कासावीस होतो. त्यांच्या सावलीची गरज ओळखून श्री. रांधवणे यांनी एसटी बसस्थानक चौकात मंडपाबरोबरच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. जनतेने विशेषतः तरुणाईने पोलिसांशी कोणत्याही कारणावरून हुज्जत घालू नये व कायदा हातात घेऊ नये. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. रांधवणे यांनी केले आहे.

[*मनसे  ' माणुसकी प्रतिष्ठान 'चे एक पाऊल पुढे*

 शेवगाव शहरातील कोविड सेंटर व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट रुग्णांसाठी मनसेने दोन वेळच्या जेवणाची आजपासून मोफत व्यवस्था केली आहे. गरजूंनी संपर्क साधावा, असे आवाहन गणेश रांधवणे यांनी केले आहे.

* मनसे हेल्पलाइन :८१७७९५७९६७

* ज्ञानेश्वर कुसळकर :९५६११५२९२९

* कृष्णा महाराज कु-हे: ९९७०८६९७४५

* देविदास हुशार : ९५५२१३४२०७ ]


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या