Ticker

6/Breaking/ticker-posts

ढाकणे प्रतिष्ठान व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखाना उभारणार 100 खाटांचे कोविड सेंटर - अॅड ढाकणे

  अशा प्रकारचे सेंटर उभारणारा केदारेश्वर राज्यात पाहिला 


लोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

टाकळीमानुर : - शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कढती संख्या लक्षात घेत तसेच तालुका प्रशासनावर पडत असलेला आरोग्य व्यवस्थेचा स्थान पाहता रुग्णांना स्थानिक पातळीवर सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कै . सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बोधेगाव व पाथर्डी येथे शंभर खाटाचे सुसज्ज सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती अॅड .प्रतापराव ढाकणे यांनी  दिली .

अॅड ढाकणे म्हणाले की गेल्या काही दिवसापासून शेवगाव पाथर्डी शहर व तालुक्यात कोरूनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे दोन्ही तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील व ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळवताना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे .दोन्ही तालुक्यातील आरोग्य रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यास आरोग्य विभाग आघाडीवर आहे मात्र त्यांना अधिकचा आधार देण्याची गरज आहे .

 आम्ही दोन्ही तालुक्यात रुग्णांसाठी सेवा केंद्र उभारत आहोत व यापुढील सेंटर केंद्रावर रुग्णांना सर्व सुविधा देण्यात येतील त्यासाठी आरोग्य विभाग व संस्थेच्या वतीने आराखडा तयार करण्यात येणार आहे पाथर्डी येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयाच्या इमारतीमध्ये पन्नास खाटांचे व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील इमारतीत पन्नास खाटाचे कोविड सेंटर उभारयात येणार असून साखर कारखान्याच्या वतीने कोविड सेंटर उभारणारा राज्यात केदारेश्रर पहिला असेल ,समाजीक बांधिलकिच्या जाणीवेतुन कोविड सेंटर उभाच्यात येणार असल्याचे ढाकणे यानी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या