Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना इफेक्ट : यंदाही १ ली ते ८ वी सरसकट पास ..



लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे : -महाराष्ट्र्र राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रोजची आकडेवारी पहिली तर रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर परीक्षांबाबतही काही निर्णय घेण्यात आले आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले होते. शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे. 

या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. कोरोनाच्या काळामध्येही शाळा ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल या माध्यमातून सुरु होत्या. पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थी जे RTE अंतर्गत त्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या