लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: करोना रुग्णांवर
उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडीसीव्हीर आणि
टोसीलिझुमॅब या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढल्याने बाजारात त्यांचा तुटवडा भासत
आहे. या दोन्ही इंजेक्शनची साठेबाजी, काळाबाजार सुरू असतानाच
सायबर भामटेही या संधीचा पुरेपूर गैरफायदा घेत आहेत. अनेक नामांकित फार्मा
कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातबाजी करून गरजू लोकांकडून ऑनलाइन
पैसे घेऊन फसविण्याच्या घटना वाढल्या आहेत. खातरजमा केल्याविना असे कोणतेही आर्थिक
व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
*हे लक्षात ठेवा...*
सोशल मीडियावरील जाहिरातींकडे दुर्लक्ष
करा.
जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क करू नका.
जाहिरातीमधील लिंकवर क्लिक करू नये.
कोणतीही कंपनी परस्पर इंजेक्शन विक्री करत
नाही.
खासगी तसेच शासकीय रुग्णालयांतच इंजेक्शन
पुरवली जातात.
कंपन्यांच्या अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क
करावा.
इंजेक्शनसाठी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू
नये.
0 टिप्पण्या