पालकमंत्र्यांचे जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम उधळून लावू
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
खरवंडी (कासार)- कोरोना परिस्थिती जनतेचे हाल करणा-या, जनतेला वा-यावर सोडणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हयात कुठे हि फिरू देणार नाही असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष देविदास खेडकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना पालकमंत्री या काळात टिका झाल्यावर बैठक घेऊन गायब झाले असून आज जिल्ह्यातील जनता वा-यावर सोडलेली आहे. त्यांचे सर्व कार्यक्रम उधळून लावू असे सांंगून खेडकर यांंंंनी रेमडिसिव्ह व ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झालेला असून या गोष्टी जनतेला उपलब्ध करून देण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पैसे असूनही औषधे इंजेक्शन मिळत नसतील तर असल्या सरकारला चाटायचे का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला .
आपल्याच डोळयासमोर घरच्याचे मरण पहाण्याची वेळ जनतेवर आलेली असून रेमडीसिव्हर, बेड विना लोकं मरत असतील तर सरकार आणि पालकमंत्री काय कामाचे योग्य नियोजन केले असते तर जनतेवर हि वेळ आलीच नसती .
जिल्हात मात्तबर पुढारी, मंत्री असताना जनतेला आज सरकारच्या नाकर्तेपणा मुळे वणवण भटकण्याची वेळ आली असून कोरोना परिस्थिती कधी ना कधी निवळणार आहेच,येत्या दोन दिवसात जिल्ह्यात जिल्ह्यातील जनतेला रेमडीसिव्हर इंजेक्शन व ईतर औषधांचा योग्य पुरवठा न झाल्यास कोरोना महामारी संपल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हयात कुठे हि फिरू देणार नाही तसेच त्यांचे होणारे कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना उधळून लावल्या शिवाय राहणार नाही. असा ईशारा मनसेचे जिल्हा अध्यक्ष देविदास खेडकर यांनी यावेळी दिला आहे.
स्थानिक पालकमंत्री देण्याची मागणी
प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक असावा म्हणजे स्थानिक पातळीवर योग्य नियोजन करता येईल याकरिता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे स्थानिक पालकमंत्री देण्यासंबधी मागणी करून पाठपुरावा करणार आहोत -देविदास खेडकर
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर
0 टिप्पण्या