Ticker

6/Breaking/ticker-posts

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार? 'या' ३ एग्झिट पोलचा मोठा अंदाज

 







लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).

 कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ८ व्या आणि अखेरच्या मतदान गुरुवारी झालं. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात विक्रीम ७६.०७ टक्के मतदान झालं, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आयोगाकडून पश्चिम बंगाल निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी जाहीर होताच दुसरीकडे १० वेगवेगळ्या एजन्सी आणि न्यूज चॅनेल्सचे एग्झिट पोल जाहीर  झाले. यापैकी तीन एग्झिट पोलने भाजपचे ( पश्चिम बंगालमधील सत्तेचं स्वप्न पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

टाइम्स नाउ- सीव्होटर, इंडिया टुडे - एक्सीस माय इंडिया, रिपब्लिक-सीएनएक्स, पी-एमएआरक्यू, ईटीजी रिसर्च आणि जन की बात यांच्यासह एकूण १० संस्था आणि न्यूज चॅनेल्सनी पश्चिम बंगालसह इतर ४ विधानसभा निवडणुकांचेही एग्झिट पोल जाहीर केले. या वेगवेगळे एग्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. पण या पैकी काही एग्झिट पोल असे आहेत ज्यांनी भाजप पश्चिम बंगालमध्ये इतिहास रचेल, असा दावा केला आहे.

Total Seats : 292

Majority Mark : 147

Source:

POLL OF POLLS

PARTY

PROJECTED

TMC

141

BJP

138

CPM+

13

OTH

0



पश्चिम बंगालमध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकी फक्त ३ जागा जिंकणारी बाजप या निवडणुकीत मात्र २०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा हे सतत पश्चिम बंगालमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि सत्ता येईल, असा दावा करत आहेत. कारण काही संस्थांच्या एग्झिट पोलमधून या दाव्यांना काहीशी बळकटी मिळताना दिसतेय.

रिपब्लिक- सीएनएक्स, जन की बात आणि इंडिया टीव्ही- पिपल्स पल्सच्या एग्झिट पोलमधून भाजपला निवडणुकीत बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात इंडिया टीव्हीच्या एग्झिट पोलमधील आकडे हे चकीत करणारे आहेत. इंडिया टीव्हीच्या एग्झिट पोलनुसार निवडणुकीत ममता बॅनर्जींना ६४ ते ८८ जागा मिळतील. तर भाजपचा १७३ पैकी १९२ जागांवर विजय होईल. हा आकडा बंगालमधील स्पष्ट बहुमत दाखवणारा आहे.

याशिवाय रिपब्लिक-सीएनएक्सच्या एग्झिट पोलमध्येही भाजप मोठा पक्ष म्हणून पश्चिम बंगालमध्ये उभारून येत आहे. रिपब्लिक आणि सीएनएक्सच्या एग्जिट पोलनुसार भाजप १४३ जागांवर विजय मिळवेल. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला १३३ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडीला १६ जागांवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.


जन की बातच्या एग्झिट पोलच्या अंदाजात भाजप १७३ जागा जिंकेल, ही संख्या बहुमताच्या आकड्या पेक्षा खूप जास्त आहे. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ११३ मिळतील आणि ६ जागा या काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीच्या खात्यात जातील, असं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल होणार?

या तिन्ही संस्थांशिवाय इतर संस्थांच्या एग्झिट पोलमध्ये मात्र भाजपला शंभरी गाठेल पण ममता बॅनर्जी सत्ता कायम ठेवतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पण इंडिया टीव्ही-पिपल्स पल्स आणि जन की बात आणि रिपब्लिक-सीएनएक्सच्या एग्झिट पोलनुसार निकाल लागले तर पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल घडेल. पण हे फक्त आंदाज आहेत. आणि असं होईल की नाही? याचं उत्तर २ मे रोजी म्हणजे रविवारी लागणाऱ्या निकालातून मिळेल.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या