Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरसह राज्यात कोरोनाचे थैमान; वाचा किती पॉझिटिव्ह

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अहमदनगर : -राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजार पार करत आहे. आजही राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 60 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली 

आज राज्यात 53,335 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आजपर्यंत एकूण 29,59,056 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 एवढा झाला आहे. आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान झले आहे. तर आज 349 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 63 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,30,26,652 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 36,39,855 (15.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,87,478 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 27,273 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज एकूण 6,20, 060 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

नगर जिल्ह्यात आज विक्रमी ३०९७ बाधित
 
जिल्ह्यात आज १८८५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८ हजार १०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३०९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६६९४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८७१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८२९ आणि अँटीजेन चाचणीत १३९७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६१, अकोले ३०, जामखेड ३२, कर्जत ४३, कोपरगाव ४०, नगर ग्रामीण ५०, नेवासा १६, पारनेर ३७, पाथर्डी ६२, राहता ८४, राहुरी ०६, संगमनेर ८२,  शेवगाव ४१, श्रीगोंदा २७, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड २७, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३, अकोले ५१, जामखेड ३४, कर्जत १६, कोपरगाव १६, नगर ग्रामीण २३, नेवासा २८,  पारनेर २८, पाथर्डी ०८, राहाता १०८,  राहुरी २३, संगमनेर १४७, शेवगाव ०५, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ६२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७, इतर जिल्हा १४ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १३९७ जण बाधित आढळुन आले. मनपा १९१, अकोले ६६, जामखेड १३, कर्जत १३१, कोपरगाव १२१, नगर ग्रामीण ९६, नेवासा ९०, पारनेर ६८, पाथर्डी १२५,  राहाता १६०, राहुरी ७८, संगमनेर ३८, शेवगाव ६८, श्रीगोंदा ४७, श्रीरामपूर ८२, कॅन्टोन्मेंट बोर्ड १२ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ३९७, अकोले १४०, जामखेड ३७, कर्जत २०८,  कोपरगाव ७८, नगर ग्रामीण १५२, नेवासा ४७, पारनेर ५३, पाथर्डी ८२, राहाता ७१, राहुरी ११२, संगमनेर २२४,  शेवगाव ८७,  श्रीगोंदा १८,  श्रीरामपूर ७१, कॅन्टोन्मेंट ५६, मिलिटरी हॉस्पिटल ०६, इतर जिल्हा ४४ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या