संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांची माहिती
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : -शेवगाव तालुक्यातील मौजे राक्षी येथील कै. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेजच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२०मध्ये दैदिप्यमान यश संपादित केले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९४.८१% तर द्वितीय वर्षाचा निकाल ९४.६२% तर तृतीय वर्षाचा निकाल ९७.६७% लागला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली .
प्रथम वर्षातील दळवी वर्षा मच्छिंद्र ही विद्यार्थीनी ८१.२९% गुणांसह प्रथम आली तर द्वितीय वर्षातून केकते शुभम संतोष या विद्यार्थ्याने ८६.९५% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला . तर तृतीय वर्षातून रोटकर ऋषिकेश लक्ष्मण हा विद्यार्थी ८७.५२% गुणांसह प्रथम आला आहे. १५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तंत्रनिकेतनचा एकूण निकाल ९६ टक्के लागला आहे.
प्रथम वर्ष सिव्हीलमध्ये दळवी वर्षा (८१.२९%), द्वितीय वर्ष सिव्हीलमध्ये खेडकर विनय ( ८३.४४% ) तर तृतीय वर्ष सिव्हीलमध्य बडे तुषार (८२.९०% गुणांसह प्रथम आले आहेत. प्रथम वर्ष कॉम्प्युटरमध्ये सर्जे माधुरी (७८.७१%), द्वितीय वर्ष कॉम्प्युटरमध्ये दांडगे किरण (८४.२७%) तर तृतीय वर्ष कॉम्प्युटरमध्ये दौंड पियुष (८२.७८%) गुणांसह प्रथम आले आहेत. द्वितीय वर्ष ईअॅण्डटीसीमध्ये मडके अभिषेक ( ८६% ) तर तृतीय वर्षामध्ये तांदळे नितीन ( ८४.८४% ) गुणांसह प्रथम आले आहे. प्रथम वर्ष मेकॅनिकलमध्ये बाबर श्रीकांत (७७.५७%), द्वितीय वर्ष मेकॅनिकलमध्ये केकत शुभम संतोष (८६.९५%) तर तृतीय वर्ष मेकॅनिकेलमध्ये रोटकर ऋषिकेश लक्ष्मण (८७.५२% गुणांसह प्रथम आले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय प्रतिकुल परिस्थितीत विद्यार्थ्यांचे तासिका आणि प्रात्यक्षिक ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येत आहेत. नियमित सॅनिटायझेशन, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, नियमित टेम्परेचर आणि ऑक्सीलेव्हल चेकींग करून कोरोनाला निर्बंध घालण्यात येत आहे. तसेच सर्व प्रशासकीय आणि अध्यापकीय कामकाज ऑनलाईन माध्यमातून करण्यात येत आहे.
नियमित तासिकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी विभागप्रमुख प्रा. महेश मरकड, प्रा. सचिन म्हस्के, प्रा. संपदा उरणकर, प्रा. सुनिल औताडे विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रा.विश्वास घुटे, प्रा. संकेत मोटाले, प्रा. संदिप बोराळे, प्रा. पुजा गव्हाणे, प्रा. अश्विनी गोरे, प्रा. आसाराम भिसे, प्रा. प्रभुणे विलास, प्रा. शितल ब्राह्मणे, प्रा. खुरूद कैलास, विद्यार्थ्यांना नियमित तासिका/प्रात्यक्षिकांबरोबरच संबंधित विषयाचे अद्ययावत ज्ञान देण्यासाठी गुगल मीट, युट्युब, पॉवर प्रेझेन्टेशन, स्कीलबेस्ड असाईनमेंट इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रचलित परीक्षा पद्धतीबरोबरच एमसीक्यु पद्धतीने अधिकाधिक सराव करून घेत आहेत. याचाच परिपाक म्हणजे आज विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे दैदिप्यमान यश आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे, सचिव श्रीमती जया राहाणे, समन्वयक प्रा.ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. आर. एच अत्तार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या