Ticker

6/Breaking/ticker-posts

शनिशिंगणापूर येथे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करणार. - मंत्री, ना.शंकरराव गडाख पा.

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शनिशिंगणापूर:-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या संपूर्ण  राज्यात परिस्थिती अत्यंत चिंताजनक व भयावह  बनली असून रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या लाटेत बहुतांश रुग्णांना ऑक्सिजन  व रेमडेसीविर इंजेक्शनची गरज भासत आहे.

 या पार्श्‍वभूमीवर शनिशिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला नामदार गडाख यांनी आज भेट देऊन कोरोना रुग्णांशी संवाद साधला.  त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांना देण्यात येणाऱ्या जेवण व इतर सोयी-सुविधा, औषधोपचार इ.बाबत माहिती घेतली. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शिंगणापुर ग्रामीण रुग्णालयात शासकीय अधिकारीरुग्णालयातील डॉक्टर्स, देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त यांच्यासमवेत बैठक घेऊन या ठिकाणी तात्काळ 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत निर्देश दिले. त्यात 40 ऑक्सिजन बेड, 8  आयसीयू बेड ची सुविधा असणार आहे. शासकीय वैद्यकीय अधिका-यांच्या निगराणीखाली हे हॉस्पिटल सेवा देणार असून  त्यासाठी औषध पुरवठा करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक पोखरणा यांना त्याचप्रमाणे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रांत व तहसीलदार यांना सूचना केल्या.  या रुग्णालयातून तालुक्यातील गरजू कोविड रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

 

यावेळी ना.गडाख यांनी तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असलेल्या ठिकाणी तात्काळ जाहिरात देऊन भरती करण्यास सांगितले. तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीतजास्त लसीकरण मोहीम राबवावी असे निर्देशित करून सध्या सर्व शासकीय व आरोग्य यंत्रनेवर कोरोना संसर्गामुळे प्रचंड तान आलेला आहे म्हणून  नागरिकांनीही शासकीय त्यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी असे आवाहन केले.

 

 राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तरीही आम्ही शासन स्तरावरून जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.  लवकरच ऑक्सिजन व  रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर होऊन पुरवठा सुरळीत होईल. या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो कि, शासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेची संपर्क करावा.

 आपण सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. नियमित मास्कचा वापर, साबणाने नियमित हात धुणे, संपर्क व संसर्ग टाळणे यातूनच  कोरोनाचे हे युद्ध आपल्या जिंकायचे आहे व आपणा सर्वांच्या सहकार्याने व मदतीने  ही लढाई लढत आपण नक्कीच जिंकणार आहोत.घरी रहा, सुरक्षित रहा... असे आवाहन केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या