Ticker

6/Breaking/ticker-posts

मस्तच, आता Jio बजेट रेंजमध्ये लाँच करणार लॅपटॉप..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्लीः Reliance Jio ने टेलिकॉम सेक्टरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त ऑफरसह डेटा प्लान लाँच केल्यानंतर आता कंपनी एक स्वस्त किंमतीतील लॅपटॉप लाँच करणार आहे. JioBook  नावाने कंपनी लॅपटॉप लाँच करणार आहे. जिओचा हा नवीन लॅपटॉप अँड्रॉयडवर आधारित असणार आहे. यात कस्टम स्क्रीन देण्यात येणार आहे. या लॅपटॉपचे नाव JioOS असणार आहे. हा जिओ अॅप्स सोबत येऊ शकतो. JioBook मध्ये  4G LTE सपोर्ट असण्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, जिओ या सेक्टरमध्ये काम करीत आहे. मुंबईतील दूरसंचार ऑपरेटर आधीच आपल्या स्वस्त डेटा आणि स्वस्त जिओफोनमुळे देशातील मार्केटमध्ये आपली पकड मजबुक केलेली आहे. XDA च्या रिपोर्ट नुसार, Jio  ने JioBook ला बनवण्यासाठी चीनी कंपनी   Bluebank Communication Technology  (ब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) सोबत पार्टनरशीप केली आहे. ही कंपनी आपल्या कारखान्यात आधी JioPhone बनवत होती.

XDA Developers  च्या म्हणण्यानुसार, जिओबुकला गेल्या सप्टेंबर महिन्यापासून बनवले जात आहे. २०२१ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत या लॅपटॉपला टेस्टिंगसाठी बाजारात आणले जाईल, अशी शक्यता आहे.  JioBook च्या प्रोटोटाइपचा  एक फोटो शेयर करण्यात येत आहे. ज्यात या लॅपटॉपची एक झलक पाहायला मिळू शकते. लीक झालेल्या फोटो लॅपटॉपच्या विंडोज सोबत दिसत आहे. परंतु, विंडोज डिव्हाइसवर चालण्याची शक्यता नाही. JioBook ची  फायनल डिझाइन वेगळी असू शकते. XDA Developers च्या रिपोर्ट नुसार, JioBook च्या प्रोटोटाइप मध्ये 1,366x768 पिक्सल रिज़ॉल्यूशनचा डिस्प्ले सोबत Qualcomm Snapdragon 665 चिपसेट आणि Snapdragon X12 4G मॉडेमचा समावेश आहे. लॅपटॉपला अनेक व्हेरियंट्स मध्ये टेस्ट केले आहे. यात एक मॉडल मध्ये 2GB LPDDR4x रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज आहे. एक अन्य मॉडल सुद्धा आहे. ज्यात 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेजचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या