Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठीचे संवर्धन प्रत्येकाच्याच हाती -डॉ.अमोल बागुल

 जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव उपक्रमांचा शुभारंभ लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:- मराठी लिहिणे ,वाचणे, बोलणे ,ऐकणे, सांगणे यातून मराठी सुदृढ व समृद्ध होत राहणार आहे. मराठी भाषासंवर्धनाची पालखी सक्षम खांद्यांवरून निरंतर प्रवास करत राहणे नितांत गरजेचे झाले आहे. परकीय भाषांच्या आक्रमणाने मराठीचे महत्त्व निश्चितच कमी होणार नाही याची जाण प्रत्येक मराठी माणसाने ठेवणे ही काळाची गरज आहे.महाराष्ट्रातच काय परंतु जगाच्या कानाकोपऱ्यात नांदणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या हातीच मराठी संवर्धनाची जबाबदारी आहे, प्रतिपादन दोन राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक तथा सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राज भाषा गौरव दिन उपक्रम शुभारंभ सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ बागुल बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाल्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. वाचनीय पुस्तके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती "मराठी राजभाषा गौरव दिन" म्हणून साजरी होत असते. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहमदनगर यांच्यावतीने २७ फेब्रुवारी २०२१ ते १० मार्च २०२१ पर्यंत मराठी राजभाषा गौरव दिन - उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

ऑनलाईन आयोजन

ग्रंथप्रदर्शन,वाचन चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती, कवी संमेलन व विविध स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. स्वागत तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन रामदास शिंदे यांनी केले. कोरोना प्रतिकूलता कालावधीतील प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर व मास्क चा वापर आदी नियमांचा वापर कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या