Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक:अंबानी स्फोटक गाडी प्रकरण: गाडीच्या मालकानं केली आत्महत्या ?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई:   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते. कार चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, आता मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसुख हे काल रात्रीपासून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारही दिली होती. त्याचा तपास सुरू असतानाच, त्यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती. त्या गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलिसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.

क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या