Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेसचे निष्ठावान कार्यकते आर . आर . उर्फ राम पिल्ले यांचं निधन ..

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : - काँग्रेसचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते आर . आर . उर्फ राम पिल्ले यांचे कोरोना मुळे दुःखद निधन झाले .

कै . पिल्ले हे भिंगार काँग्रेसचे संस्थापक  सदस्य होते . त्यांनी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला . किंबहूना तेव्हा पासूनच ते काँग्रेस पक्षाच्या मुशीत तयार झाले . त्यांनी माजी खा. व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याबरोबर काॅलेज जीवनात चळवळी केल्या. वडील स्वा. सैनिक असल्यामुळे त्यांचाच वारसा त्यांनी  पुढे चालविला. सरोज टॉकिज बॉम्ब हल्याच्या स्मृती  ८ त्यांनी सातत्याने जागत्या ठेवल्या . प्रतिवर्षी त्यानिमित ते काहीना काही कार्यक्रम अवश्य घेत .

भिंगार वार्ड न ३मधून(सदरबाजार +वाघस्कर गल्ली) येथून ते अनेक वेळा कॅन्टो मेन्ट बोर्डावर निवडून आले . पहिल्या निवडणूकीत पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूकीत भरघोस मताधिक्य त्यांनी मिळविले . त्यासाठी कै. बापूसाहेब भापकरांनी स्वतं : पदयात्रा काढली होती. नंतर ३वेळेस व्हाईस प्रेसिडेंट झाले. वकिलीत राहून माळीवाड्यातील रूपवते बोर्डींगचे काम पाहिले. नोटरीपद भूषविले. . तसेच कॅन्टो मेंट बोडी चे व्हाईस प्रेसीडेंट म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली .

याच महिन्यात त्याचे नूतनीकरण असल्याने त्यांचा अर्ज अॅड . साहेबराव चौधरी यांनी स्वत:१३तारखेला खा . डाॅ. सुजय विखें पाटलांशी  चर्चा करून सोपविला होता. पण त्यांचे अन् माझे पण दुर्देव . अशी प्रतिक्रिया अँड. चौधरीनी व्यक्त केली .

सर्वात लोकप्रिय हसतमुख मितभाषी असे चळवळितील नेतृत्व भिंगारकरांनी  गमावले आहे . सलग १५ वर्षे भिंगार कॉग्रसचे  अध्यक्षपद त्यानी भूषविले . त्यांच्या निधनाबद्दल मंत्री बाळासाहेब थोरात , आ . सुधीर तांबे , माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा . , माजी आ. शिवाजीराव कर्डिले, खा. सुजय विखे पा आदिंनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या