Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतीशिवाय कमाईची संधी, या योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून 3.75 लाख रुपये

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : तुम्हाला शेती क्षेत्रात आपला व्यवसाय सुरू करायचा असेल, मात्र शेती करायची नसेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे आपण केवळ व्यवसायच सुरू करू शकत नाही तर त्यातून चांगले पैसेदेखील कमवू शकता. अशा परिस्थितीत रोजगाराच्या शोधात असलेल्या खेड्यातील लोकांना या योजनेचा मोठा फायदा घेता येईल.

 

तसेच, अशा लोकांना ज्यांना काही वेगळी नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या या योजनेबद्दलची माहिती देणार आहोत, तसेच याद्वारे पैसे कसे कमवायचे, तुम्हाला काय-काय करावं लागेल याबाबतची माहितीदेखील देणार आहोत.

योजना काय आहे?

केंद्र सरकारच्या या योजनेला सॉइल हेल्थ कार्ड स्कीम असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर मिनी सॉइल टेस्टिंग लॅबची स्थापना केली जाईल आणि त्यानंतर या लॅबच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात. देशातील शेतकरी कुटुंबांच्या तुलनेत सध्या प्रयोगशाळा फारच कमी आहेत. त्यामुळे त्यात रोजगाराची मोठी संधी आहे. तसेच देशाला अशा प्रयोगशाळांची खूप आवश्यकता आहे.

नेमकं काम काय?

यामध्ये शेतातील मातीची चाचणी केली जाते. मातीची (मृदेची) तपासणी करुन त्यात आढळणारे पोषक घटक शोधून काढले जातात आणि तपासणीनंतर त्यात सुधारणा करता येते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पानद वाढवण्यात खूप मदत होते. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी आणि सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून 300 रुपये प्रति नमुना इतके पैसे देण्यात येत आहेत. माती तपासल्यानंतर समजतं की, लागवडीच्या वेळी तुम्हाला किती खत द्यावे लागेल आणि सदर मातीत कोणते पीक घ्यायला हवे. याबरोबरच खतांविषयी बरीच माहिती मिळते.

ही लॅब कोण सुरु करु शकतं?

या योजनेद्वारे 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण ही प्रयोगशाळा उघडू शकतात. यासह उमेदवाराला अॅग्री क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण, द्वितीय श्रेणीसह विज्ञान विषयात मॅट्रिक असणे आवश्यक आहे.

किती खर्च होतो?

साधारणपणे अशी कोणतीही लॅब स्थापित करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आपण या मृदा आरोग्य कार्ड योजनेचा  फायदा घेतल्यास, त्यातील 75 टक्के रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते. याचाच अर्थ सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातात. यानंतर तुम्हाला केवळ 1 लाख 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. तसेच यातून तुम्ही चांगली कमाईदेखील करु शकता.

कुठे संपर्क करायचा?

लॅब सुरु करण्याची इच्छा असलेले युवक, उमेदवार, शेतकरी किंवा संस्था जिल्हा कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवू शकतात. यासाठी तुम्ही agricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळांचा वापर करु शकता. किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिक माहिती मिळू शकते. सरकार जे पैसे देईल त्यापैकी अडीच लाख रुपये प्रयोगशाळा चालविण्यासाठी टेस्ट मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर एक लाख रुपये खर्च केले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या