Ticker

6/Breaking/ticker-posts

नितीन राऊत‌ यांचं मंत्रिपद धोक्यात, ऊर्जामंत्रिपद कुणाकडे?लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )  

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्री पद जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची‌ हायकमांडसोबत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

राज्य सरकारमध्ये राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. संजय राठोड यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर अजून एक मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. कारण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती मिळतेय. नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीज आज काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे बैठक होत आहेत.

दोन्ही नेते हायकमांडच्या भेटीला

विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत पूर्वीपासूनच मिळत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी त्यावेळी दिली होती. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या