Ticker

6/Breaking/ticker-posts

नेत्यापुढं अभिनेता फिका : अखेर ..मिथून चक्रवर्ती भाजपावासी ..!

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : - अभिनेत्याचा अभिनिवेश हा केवळ त्याच्या पात्रापुरताच मर्यादित असतो वास्तविक जीवनाशी त्याचा सुतराम संबंध नसतो हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे . मायावी नगरी ही केवळ सर्व सामान्यांना भूल विव्याचा भूलभूलैया आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे ते प्रसिद्ध बंगाली चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या उदाहरणाने .. दिदीची ममता विसरून  अखेर मिथून चक्रवर्ती भाजपावासी झाले आहेत .

गेलेअनेक महिन्यापासून सिने अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपा प्रवेश चर्चेत होता .अभिनेता मिथुन चक्रवर्ती 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिगेड मैदान रॅलीमध्ये मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, 16 फेब्रुवारी रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसीने मिथुन यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती. ते 2014 पासून डिसेंबर 2016 पर्यंत टीएमसीकडून राज्यसभेत खासदार होते

दरम्यान, बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 27 मार्च रोजी बंगलामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 6 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून 31 जागांसाठी मतदान केलं जाणार आहे.

10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाचवा टप्पा 17 एप्रिल रोजी पार पडणार असून येथे 45 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. याव्यतिरिक्त 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात 41 जागांसाठी, तर 26 एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी आणि आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बंगाल निवडणूकींचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या