Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, निष्पक्ष चौकशी होईल ना…? चित्रा वाघ यांचा बोचरा सवाल

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन  असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. 


याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले.  कधी कुणी सेलीब्रिटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि
आता मनसुख हिरे.. प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य..आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी ,या सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना ? असा बोचरा  सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.


दरम्यान, मनसुख हिरेन  यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. उद्योगपती  मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या