Ticker

6/Breaking/ticker-posts

अखेर ...मुबंई ते भगवानगड बससेवा सुरू

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

खरवंडी कासार : - 'महाराष्टातील लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेञ भगवानगड,ता.पाथर्डी येथील श्री संत भगवानबाबा महाराज समाधी दर्शनासाठ मुंबई परळ ते भगवानगड बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 मुंबई परळ ते भगवानगड ही नव्याने सुरु करण्यात आलेली बस सकाळी 9 वाजता परळ येथुन निघणार असुन कल्याण आळेफाटा अहमदनगर या मार्गाने सायंकाळी 7 वाजता श्री क्षेत्र भगवानगड, ता.पाथर्डी येथे मुक्कामी असणार आहे. तीच बस दुस-या दिवसी सकाळी 9:30 ला भगवानगड येथुन निघणार असुन पुन्हा सायंकाळी 7 वाजता परळ,मुंबई आगार येथे पोहचणार आहे, या बससेवेमुळे भाविक तसेच परीरातील प्रवाशी यांना मुंबई कल्याण येथे जाण्याच्या सुविधा उपलब्ध झाली आहे. 

मुंबई ते भगवानगड ही बस सेवा  सुरु करण्यासाठी प्रा.दादासाहेब खेडकर,वामनराव किर्तने, नितिन किर्तने यांनी प्रयत्न केले . या बस सेवेची पहिली बस आज भगवान गड येथे आल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी येथे तिचे स्वागत करण्यात आले यावेळी बसचालक शिवदास खेडकर व राजेन्द्र खेडकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामनाथ जवरे रामनाथ खेडकर संभाजी दराडे विनायक किर्तने ,  महादेव बटुळे , बाबासाहेब किर्तने , रामदास किर्तने , लखन जवरे , लखन खेडकर , शिवदास जवरे , गिरी फिटर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या