Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवार फिट, पेपर वाचन सुरु , शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंच ट्विट , म्हणाल्या…

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत

शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

या शस्त्रक्रियेवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपस्थित होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रात्री उशीरा हे सर्वजण ब्रीच कँडीमधून घरी परतले. सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगितले.

शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. आता शरद पवार यांची प्रकृती कशाप्रकारे सुधारते, यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या