Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ ..मात्र , छोट्यांनी आसमान दाखवल्यावर ' त्यांना' जागा कळते...!’ -खा. सुजय विखे

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 कर्जत:-सत्ता मिळाल्यावर काही जण एवढे उंच उडतात त्यांना समोरील सर्व छोटे वाटतात मात्र या छोट्यांनी आसमान दाखवल्यावर त्यांना जागा कळते अशी टीका खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली.

कर्जत तालुक्यातील बहिरबोवाडी येथे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी जिल्हा सहकारी बँकेवर विजयी झालेले भाजपचे शिवाजीराव कर्डिले अंबादास पिसाळ व अमोल राळेभात यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुजय विखे पाटील होते यावेळी नवनिर्वाचित संचालकांसह भाजपचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत शांतीलाल कोपनर डॉक्टर सुनील गावडे  बाळासाहेब शिंदे एडवोकेट रमेश अनभुले प्रकाश शिंदे सचिन पोटरे सरपंच विजय तोरडमल काकासाहेब धांडे अंगद रुपनर सुनील यादव पप्पू शेठ दोधाड यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी चौफेर टीका केली पवार कुटुंब यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले की त्यांचा आमचा पन्नास वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे पैसा असेल परंतु कार्यकर्त्यांना मान-सन्मान व स्वाभिमान त्या ठिकाणी घाण घेऊन जावे लागेल व तसा अनुभव कर्जत तालुक्यातील आता अनेक जणांना आला असावा करण अनेक जण आता तुम्ही म्हणत होता ते खरे आहे असं बोलून दाखवत आहेत. 

 जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक राजकारण नको  बिनविरोध शेतकऱ्यांसाठी व्हावी यासाठी मी व कर्डिले यांनी  प्रामाणिकपणे प्रयत्न केले मात्र यांनी आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मात्र अंबादास पिसाळ हे विजय होणार यासाठी मी बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर देखील पण लावली होती याचे साक्षीदार कर्डिले आहेत कर्जत येथील जिल्हा बँकेची जागा सहज आणि सोपी होती काहीजणांनी ही जागा प्रतिष्ठेची करत अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजप व विखे गट येथे एक दिलाने लढ्यामुळे विजय मिळाला.

व्यक्तीसापेक्ष राजकारण

 नगर जिल्ह्याने राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिले की याठिकाणी राजकारण हे व्यक्तीच्या संबंधावर अवलंबून असते व भविष्यात देखील आपण सर्वजण एक दिलाने एकत्र आल्यास कर्जत नगरपंचायत मध्ये भाजपची सत्ता आणतानाच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील महा विकास आघाडीला पराभूत करून मात्र यासाठी सर्वांनी एक दिलाने मनापासून एकत्र येण्याची गरज आहे यासाठी संघटनेतील कार्यकर्त्यांनी देखील विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे

यावेळी बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले की जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असल्याने या ठिकाणी राजकारण न करता भाजपने सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्यावर सर्व जबाबदारी सोपवली होती परंतु जिल्ह्यातील साखर कारखाना तील मंडळींनी एकत्र येऊन त्यांच्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी एकमेकाला मदत करताना जिरायत भागातील आमच्यासारख्या लोकांना मात्र निवडणूक लढवण्याची वेळ आली मात्र ही केवळ कारखानदारांची नसून सर्व शेतकऱ्यांचे आहे हे त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्रास्ताविक अशोक खेडकर यांनी केले तर अंबादास पिसाळ व बाळासाहेब शिंदे  यांचे भाषण झाले सूत्रसंचालन पत्रकार दादासाहेब शिंदे यांनी केले

अशोक खेडकर भाजपा मध्येच सक्रिय

यावेळी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अशोक खेडकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी जाहीर करताना यासाठी माजी मंत्री राम शिंदे व शिवाजीराव कर्डिले यांचाही पाठिंबा आहे व हा सत्काराचा कार्यक्रम  अशोक खेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपा मध्येच सक्रिय होत असल्याचे सांगण्यासाठी घेतला आहे असे समजावे असे ही सांगितले

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या