Ticker

6/Breaking/ticker-posts

बोठेच्या आयफोनमधून उलगडणार अनेक गुढ रहस्य ?

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : -नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ  बोठे  काल, रविवारपासून पोलिस  कसून चौकशी करीत आहेत. तर, बोठे याचा पोलिसांनी जप्त केलेला आयफोन आज उघडला जाणार आहे. त्यासाठी बोठे याला पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले जाण्याची शक्यता आहे.

आता बोठे याच्या आयफोन मधून काय रहस्य निघणार ? याची उत्सुकता आहे. दरम्यान, बोठे हा पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याची सुत्रांची माहिती आहे. मागील वर्षी ३० नोव्हेंबरला जरे यांची हत्या झाली. या प्रकरणात बोठे याचे नाव ३ डिसेंबरला आले. तेव्हापासून तो फरार होता. बोठे याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांना आयफोन सापडला होता.

हा आयफोन लॉक असल्यामुळे तो उघडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या फोनला छेडछाड झाल्यास त्यामधील डाटा करप्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलिसांनी बंगलौर येथील कंपनीला तसेच मुंबईच्या सायबर पोलिसांना संपर्क केला होता. बंगलौर येथील कंपनीने आयफोन उघडण्यास सहा महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे सांगतिले होते.

त्यातच शनिवारी (१३ मार्चला) बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याला काल, रविवारी न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. आता पोलिस बोठे याच्याकडे चौकशी करीत असून त्याचा आयफोन सुद्धा आज उघडला जाण्याची शक्यता आहे. बोठे याची विविध क्षेत्रातील नेटवर्क पाहता, आता या आयफोन मधून नेमकी कोणती माहिती समोर येतेयं, या कडे अनेकांचे लक्ष
आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या