Ticker

6/Breaking/ticker-posts

व्यासपीठावरून खा . विखे यांच्या समोर अजित पवारांचं गुणगान .. एकच चर्चा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

कर्जत:- भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर खा. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासमोरच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते अड. बाळासाहेब शिंदे यांनी चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले त्यामुळे नेत्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काही वेळ उपस्थिताना आपण नेमके भाजपच्या कार्यक्रमात आहोत की, राष्टवादीच्या हे समजेनासे झाले,

 त्याचे झाले असे की , कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवलेल्या अंबालिका सहकारी साखर कारखान्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना संजीवनी मिळाली शेतकऱ्यांच्या उसाला 2500 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळू लागला असून सर्वांना नियमित पैसे देखील ऊसाची मिळत आहेत. याउलट दुसरीकडे कारखान्यांना ऊस घालून देखील. पैसे मिळत नाहीत असे बाळासाहेब शिंदे म्हणाले.

 

बाळासाहेब शिंदे म्हणाले की जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे मात्र या बँकेवर पूर्वी काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यशवंतराव गडाख भानुदास मुरकुटे, अरुण काका जगताप शिवाजीराव कर्डिले व घुले यां नेत्यांनी चेअरमनच्या केबिनचा दरवाजा सर्वसामान्य साठी खुला केला ही फार मोठी गोष्ट बँकेमध्ये  केली आणि  त्यामुळे सर्वसामान्यांना जिल्हा बँक आपलीशी वाटू लागली आहे.

 फसवाफसवीचे राजकारण थांबण्याची गरज

 यावेळी बोलताना बाळासाहेब शिंदे पुढे म्हणाले की जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कर्जत येथील जागा माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मुळेच भाजपला जिंकता आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील फसवाफसवीचे राजकारण हे देखील विजयाला हातभार लावणारे ठरले हे या ठिकाणी विसरून चालणार नाही,  तालुक्यातील आजही अनेक नेते कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाचे आहेत हे समजत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना व जनतेला देखील समजत नाही या निवडणुकी मधून भाजपने व सर्वच पक्षांनी या ठिकाणी धडा घ्यावा व प्रामाणिकपणाचे राजकारण भविष्यामध्ये करावे भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद द्यावी असे आवाहन देखील शिंदे यांनी यावेळी बोलताना केले या कार्यक्रमानंतर बाळासाहेब शिंदे यांचे भाषण तालुक्यामध्ये जोरदार चर्चेचा विषय झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या