Ticker

6/Breaking/ticker-posts

शहर बँकेचे माजी चेअरमन व नाटय व्यावसायिक सतिश अडगटला यांचं निधन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ .नगर : नगरमधील प्रसिध्द नाट्य व्यावासयिक तथा अहमदनगर शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक सतीश दत्तात्रय अडगटला यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

त्यांच्यापश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे , भाऊ, भावजय, पुतणे, बहिणी असा मोठा परिवार आहे. विविध क्षेत्रांचा अभ्यास व आवड असल्यामुळे फार मोठा मित्र परिवार जीवनात जोडला.सतीश अडगटला अतिशय हजरजबाबी हुशार व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता. जवळपास 40 वर्षे त्यांनी नाट्य व्यवस्थापनामध्ये काम करीत नगरमध्ये अनेक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग आणले. सामाजिक व धार्मिक कार्याची त्यांना आवड होती. त्या माध्यमातून त्यांनी नगर शहर सहकारी बँकेत जवळपास 30 वर्ष संचालक म्हणून काम पाहिले. या काळात दोन वेळा त्यांनी बँकेचे चेअरमनपदही भूषविले.

स्व. अडगटला यांना  लिखाणाचीही आवड होती. त्यांनी नगर जिल्ह्याच्या नाट्य चळवळींमध्ये योगदान देत नवोदित नाट्यकर्मींना वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांचे अर्बन बँक चौकात प्रसिध्द चार्मिंग पेन सेंटर या नावाने दुकान आहे. अहमदनगर जिल्हा जाहिरातदार संघटनेचेही ते ज्येष्ठ सल्लागार होते. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या