Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर : एलसीबीची धडाकेबाज कारवाई ! २ कोटी ६९ लाखच्या अलिशान कार जप्त ..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ . नगर : टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनींकडून वाहनं भाडेतत्वावर घ्यायची आणि ती वाहनं गहाण ठेवत फसवणूक करायची, अशी सफाईदार गुन्हेगारी साखळी उभारणाऱ्या शशिकांत मारुती सातपुते (रा. भोयरे गांगर्डा, ता. पारनेर) या गुन्हेगाराला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं (एलसीबी) शिथापिने जेरबंद केलं आहे . या गुन्हेगाराकडून पोलिसांनी २ कोटी ६९ लाखांच्या तब्बल १६ अलिशान कार्स जप्त केल्या आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली .

अधिक माहिती देतांना ते म्हणाले, या गुन्हेगारानं साथीदारांच्या मदतीनं चोरलेल्या अन्य वाहनांचादेखील आम्ही शोध सुद्धा लावणार आहोत. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या सातपुते याचे अन्य कोणी साथीदार आहेत, याचा शोध पोलीस घेत आहोत.

याप्रकरणी महेश प्रताप खोबरे (रा. पुणे) यांनी फिर्याद दिलीय. मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इटीगा, झेस्ट अशा एकूण २२ कार महाबली एन्टरप्रायजेस या नावाने फिर्यादी खोबरे यांच्याकडून सातपुते याने भाड्याने चालविण्यासाठी घेतलेल्या होत्या.

त्यापैकी ९ कार्स आरोपी सातपुते याने फिर्यादीला परत केल्या. परंतु उर्वरित १३ कारचे भाडे आणि सदरच्या १३ कार्स फिर्यादी यांना परत केल्या नाहीत.

यामध्ये १) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्युजी-७२३६. २) इनोका क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्युजी-४९५०. ३) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्युडब्ल्यू-८७९३. ४) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-पीक्यु-८५१५. ५) टाटा झेस्ट कार नं. एमएच-१२-एसएफ-५२९२. ६) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच १क्युडब्ल्यू-८६२८.

७) स्विफ्ट कार नं. एमएच-१४-जीडी-७४८७. ८) इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच-१२-क्यूजी- ७२३६ ९) एसोस कार नं. एमएच-१६-बीवाय-५६४०. १०) इनोव्हा कार नं. एमएच-१७-एझेड- ५४६४. ११) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच-१४-डीएक्स-५३५२.

१२) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच-४३-एजे-०५२५. १३) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच ०२-बीजी-२१००. १४) बीएमडब्ल्यू कार नं. एमएच-१४-डीक्यू-१९३३. १५) स्विफ्ट डिझायर कार नं. एमएच-४२- के ४३२८. १६) इनोव्हा कार नं. एमएच-१४-सीएक्स-८९१९ या कार्सचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटीलयां च्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीने लावलेल्या या गुन्ह्याचा तपासाबद्दल एलसीबीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या