Ticker

6/Breaking/ticker-posts

आपल्या आरोग्य संस्कृतीचा सर्वांनी स्विकार करावा -महापौर बाबासाहेब वाकळे

 योग शिक्षक पदविका’ प्रमाणपत्राचे वितरण

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 



अहमदनगर:-सध्याच्या कोरोनाच्या  स्पर्धेच्या युगात अनेक लोकांमध्ये मानसिक ताणतणाव आणि शारीरिक रोग वाढत आहेतत्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेतअशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांनी नियमित योगसने करावीतयामुळे अनेक व्याधी विना औषध दूर होऊ शकतातअनेक आजारांवर प्राणायमयोगाने मात करता येतेशासनाच्यावतीने योग सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेजागतिक स्तरावर योगाचे महत्व मान्य केले असल्याने ही आपल्या आरोग्य संस्कृतीचा सर्वांनी स्विकार करावाअसे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

योग विद्या धामअहमदनगर या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ‘योग शिक्षक पदविका’ प्रमाणपत्र वितरण महापौर वाकळे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आलेयाप्रसंगी ते बोलत होतेयावेळी योग विद्या धामचे संस्थापक सदस्य दत्ता  दिकोंडाउपाध्यक्ष दिलीप कुलकर्णीप्राचार्य माणिक अडाणे आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले,  योग विद्या धाम ही संस्था अहमदनगर जिल्ह्यात योगाचा प्रचारप्रसार  योग शिक्षणाचे महत्वाचे काम अविरत गेली 36 वर्षापासून करीत आहे ही गोष्ट उल्लेखनिय आहेसंस्थेचे कार्य अधिक व्यापक व्हावेयासाठी आपण सर्वोतोपरि मदत करुअसे आश्वासन दिले.

 याप्रसंगी दत्ता दिकोंडा म्हणालेयोग विद्या धामच्यावतीने शहरातील विविध भागात नागरिकांच्या सोयीसाठी वर्ग चालविले जात आहेतत्याचबरोबर एखाद्या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार विशेष वर्गही घेतले जातातयोगाचे महत्व नागरिकांना पटत असूनत्यामुळे अनेक लोक योगकडे वळत आहेतत्यामुळे योगाचे योग्य  शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी चांगले योग शिक्षक निर्माण व्हावेयासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ‘योग शिक्षिका पदविका’ कोर्स सुरु असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

सौअर्चना कुलकर्णी,  सौप्रिती बोरूडेडॉपल्लवी राऊत,  शेखर पाटकर या नवीन योग शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपमाला लांडे   वैशाली पांढरे यांनी केले.  तर योग विद्या धामच्या सचिव सौअंजली कुलकर्णी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या