Ticker

6/Breaking/ticker-posts

‘सिंधी जनरल पंचायत’च्या अध्यक्षपदी महेश मध्यान


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर- येथील पुज्य सिंधी जनरल पंचायत च्या अध्यक्षपदी महेश गिरधारीलाल मध्यान यांची एकमताने निवड करण्यात आलीसिंधू मंगल कार्यालय येथे समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.  सिंधी जनरल पंचायतचे माजी अध्यक्ष गिरधारीलाल उर्फ लालूशेठ मध्यान यांच्या निधनाने रिक्त असललेल्या पदासाठी समाजातील प्रमुख मान्यवरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलायावेळी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष महेश मध्यान यांचा सत्कार करण्यात आला.

 सत्कारास उत्तर देतांना महेश मध्यान म्हणालेआजोबा स्व.राधाकिसन मध्यान  वडिल स्व.गिरधारीलाल मध्यान यांनी चालविलेला समाजसेवेचा वारसा मी यापुढेही सुरु ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असूनसमाज हितासाठी सर्वानुमते योग्य निर्णय घेऊन विविध उपक्रमयोजना आखल्या जातीलत्यासाठी सर्व समाज बांधवांच्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीतएकजुटीने कार्य केली जातीललवकरच नूतन पदाधिकार्यांची  कार्यकारिणी समितीची निवड करण्यात येईलअसे सांगितले.

या बैठकीस दामोदर बठेजासुरेश हिरानंदानीआनंद कृष्णानीनानकराम मटलाईकुमार गाबराप्रदीप आहुजाबन्सी आसनानीरामशेठ मेंघानीसुरेश कटारियाजयकुमार रंगलानीरुप मोटवाणीकिशन पंजवानीकिशोर खुबचंदानीजयराम गाबरासुनिल बजाजलिलाराम खुबचंदानीरमेश कुकरेजाप्रकाश तलरेजादिपक तलरेजा आदि मान्यवर उपस्थित होते.

 महेश मध्यान यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे समाजाच्या सर्व स्थरातून अभिनंदन होत असूनमहेश यांच्या नि:स्वार्थ समाजासेवेची ही पावती मिळाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या