Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजप नेत्यांचा काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय: रोहित पवारांचे भाकित लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: दिल्लीत शरद पवार यांची पत्रकारपरिषद सुरु असताना सोशल मीडियावरुन भाजप नेते पटापट प्रतिक्रिया देत होते. हे सगळे पाहता भाजपचा काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, काही झालं तरी राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्षे नक्की टिकेल, असा दावा रोहित पवार यांनी केला ते मंगळवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत, असा भास विरोधकांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहलेल्या पत्रात तारखांचा मेळ लागत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय युती असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी या साऱ्या प्रकाराविषयी वाच्यता का केली नाही? पद गेल्यानंतर त्यांनी आत्मविश्वासाने हा विषय मांडला. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यापाठी राजकीय ताकद असल्याचे काही लोकांना वाटत आहे. याप्रकरणात विरोधकही खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

भाजपच्या हातात आता फक्त राजकारणं करणं एवढंच उरलं आहे

केंद्र सरकारकडे अनेक प्रश्न अडकले असताना त्यावर कोणी काही बोलत नाही. मात्र, असे काही विषय आल्यानंतर हे सर्व बोलायला लागतात.  त्यामुळे वाईट वाटतं. भाजपच्या हातात आता फक्त राजकारण करणं एवढंच उरलं आहे. सुशांत सिंह प्रकरणात देखील विरोधकांनी राजकारण केलं. आतादेखील दोन महिने हे प्रकरण तापवतील, नंतर सत्य बाहेर येईल. या सगळ्याच्या माध्यमातून भाजप लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या