Ticker

6/Breaking/ticker-posts

आइसलँडमध्ये ८०० वर्षानंतर ज्वालामुखीचा स्फोट; आगीची नदी वाहत असल्याचा भास..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

रेक्यावीक:-  आइसलँडमध्ये अनेक भूकंपानंतर आता Fagradals Mountain ज्वालामुखीमध्ये जोरदार स्फोट झाला आहे. जवळपास ८०० वर्षानंतर या ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला आहे. या ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणावर लाव्हा बाहेर पडत आहे. त्यामुळे आगीची नदी वाहत असल्याचा भास होत आहे. या ज्वालामुखीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 ज्वालामुखीच्या स्फोटानंतर मोठ्या संख्येने या लोकांची जवळच्या परिसरात गर्दी झाली आहे. एका व्हिडिओग्राफरने या ज्वालामुखीजवळ आपला ड्रोन कॅमेरा पाठवला. या ड्रोनने ज्वालामुखीची दृष्ये कॅमेऱ्यात कैद केली आहेत. हा व्हिडिओ पत्रकार आणि युट्युबर अँथोनी क्विटानो यांनी आपल्या ट्विटर अकाउंटला शेअर केला.आइसलँडची राजधानी रेक्यावीकजवळील दक्षिणपश्चिम भागातील रेक्येनीस पेनिनसुलामध्ये हा ज्वालामुखी फुटला आहे. शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

 मागील ८०० वर्षांपासून हा ज्वालामुखी शांत होता. आता मात्र स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाव्हा बाहेर पडत असून जवळपास ३२ किमी अंतरावरून याची धग दिसत असल्याचे म्हटले जात आहे. हा ज्वालामुखी निवासी परिसरापासून दूर आहे. याच्यापासून जवळचा रस्ताही २.५ किमी दूर आहे. त्यामुळे तूर्तास कोणताही परिसर रिकामा केला जाणार नाही. मागील काही दिवसांपासून भूकंप येत होते. त्यामुळे ज्वालामुखीचा स्फोट होणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या