Ticker

6/Breaking/ticker-posts

दिवंगत शिवसेना नेते स्व.अनिलभैय्या राठोड यांना नगरकर कधीही विसरू शकत नाहीत - किरण काळे

काँग्रेसच्यावतीने शिवालय येथे स्व.राठोड यांना अभिवादन

दिवंगत शिवसेना नेते स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंती दिनानिमित्त शिवालय येथे जाऊन त्यांच्या स्मृतीस अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळेब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचाशहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदेशहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरेक्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटीललोकेश बर्वे आदींनी अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते विक्रम राठोड उपस्थित होते.



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर: :  स्व.अनिलभैय्या राठोड हे सर्वसामान्य नगरकरांचे कैवारी होते. त्यांनी दीनदुबळ्यांना त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना सतत न्याय द्यायचा प्रयत्न त्यांच्या हयातीत केला. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य नगरकर हे कधीही विसरू शकत नाहीत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

 स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंती दिनानिमित्त शिवालय येथे जाऊन त्यांच्या स्मृतीस अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते विक्रम राठोड, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, लोकेश बर्वे आदी उपस्थित होते. 

 यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्व.अनिलभैय्या   हे सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला रात्री-अपरात्री धावून जायचे. जनतेला त्यांच्याविषयी विश्वास होता की आपण नेलेली समस्या ही नक्कीच त्यांच्या हातून सुटेल. नगरकरांना संरक्षण देण्याची त्यांनी घेतलेली भूमिका आजही नगरकरांच्या स्मरणात आहे. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या