Ticker

6/Breaking/ticker-posts

गांधी यांच्या आकस्मीत निधनाने भाजपाची मोठी हानी - प्रा. बेरड
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : -मा खा दिलीप गांधी यांच्या अकास्मीत निधनाने जिल्ह्यातील भाजपा ची मोठी हानी झाली आहे, पक्षासी एकनिष्ठ असणारा ,अहमदनगर जिल्ह्यात पक्षाला एक नंबरचे स्थान मिळवुन देण्यासाठी सतत झटणारा वकार्यकर्त्याशी सतत संपर्कात असणारा नेता आज आपल्यातुन निघुन गेला असल्याची  प्रतिक्रिया भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी व्यक्त  केली .

जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याना नावानिशी ओळखणारा व कधीही व कुठेही जन सामान्यांना भेटणारा हा नेता गेल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याना आपल्या कुटुंबातील कर्ता माणुस गेल्याचे दु:ख झाले आहे। पक्षाने सांगीतलेली प्रत्येक निवडणुक  त्यांनी जिंकली आहे अशा अर्थाने ते अपराजीत नेता होते , एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांचा होता,  मी अहमदनगर जिल्हा  भाजपाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या