Ticker

6/Breaking/ticker-posts

सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेची आन्सर की जारी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने देशातील सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीतील प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा AISSEE अर्थात ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका म्हणजेच आन्सर की जारी केली आहे. यासोबतच उमेदवारांची ओएमआर रिस्पॉन्स शीटदेखील ४ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. उमेदवार आन्सर की आणि OMR रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ aissee.nta.nic.in वर जाऊ शकतात.

आन्सर की आणि ओएमआर शीट ६ मार्च पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. ज्या उमेदवारांना आन्सर शीटवर हरकत घ्यायची आहे, त्यांनी शुल्क भरून हरकत नोंदवावी. ओएमआर रिस्पॉन्स शीटला हरकत घेण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क परत केले जाणार नाही. AISSEE  आन्सर की साठी प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरून हरकत नोंदवता येईल. Sainik School Entrance Exam Answer Key: आन्सर की वर हरकत नोंदवण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे

* सर्वात आधी अधिकृत वेबसाइट https://aissee.nta.nic.in वर जा.
* यानंतर “Display OMR answer sheet/Challenge recorded response & answer key” लिंक वर क्लिक करा.
* आपल्या क्रिडेंशियल्सच्यचा मदतीने लॉग इन करा.
* यानंतर ‘Challenge(s) regarding Answer Key' वर क्लिक करा.

*  आता तुम्ही आन्सर की वर हरकत नोंदवू शकता.
* सपोर्टिंग डॉक्यूमेंट्स को अपलोड करा.
* लष्करभरती होणार अधिक पारदर्शक
* आता ‘Save your Claim' वर क्लिक करा आणि पुढील पेजवर जा.

*  तुम्ही ज्या प्रश्नांवर हरकत घेतली आहे, ते सर्व प्रश्न तुम्हाला दिसतील.
* यानंतर ‘Save your Claim and Pay Fee Finally' वर क्लिक करा.
* आता शुल्क भरा.
AISSEE 2021  answer key, OMR response sheet पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

उमेदवारांच्या हरकतींचा अभ्यास केल्यानंतर NTA अंतिम उत्तरतालिका जारी करेल. सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल अंतिम आन्सर की जारी झाल्यानंतरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या