Ticker

6/Breaking/ticker-posts

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरुच; शेतकरी पुन्हा उद्ध्वस्त..

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार :-पाथर्डी तालुक्यात पुर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी  पाऊस झाला  असून काही भागात गाराही पडल्याने  शेतकऱ्याच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे रब्बी हंगामातील ऊस गहु मका भुईमूग हरभरा टरबुज खरबूज आदी पिक भुईसपाट झाली आहेत  तर चिचं व आब्यांच्या फळाचे प्रचंड नुकसान झाले आहे अगोदरच शेतीला भाव नसल्याने शेतकरी शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच हे अस्मानी संकट आल्याने शेतकरी कोलमडला आहे खरवंडी कासार मालेवाडी ढाकणवाडी मिडसांगवी भारजवाडी भालगाव या ठिकाणी शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे भगवानगड परिसरातील मालेवाडी खरवंडी कासार भारजवाडी ढाकणवाडी जवळवाडी मीडसांगवी एकनाथवाडी मुंगुसवाडे भालगाव आदी गावातील शेतकर्यांच्या पीकांचे पंचनामे करुन झालेल्या नुकसानी मुळे मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ऊसतोड मजुर कामगार आघाडी अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रा दादासाहेब खेडकर यांनी केली आहे.

मालेवाडी येथे विज पडून शेतकरी जखमी  

मालेवाडी येथील शेतकरी माणिक ज्ञानोबा दराडे हे शेतात काम करत असताना त्यांच्या जवळच वीज पडली व ते जखमी झाले पुढील उपचारासाठी दराडे यांना अहमदनगर हलवले असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या