Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रदर्शनाआधीच सलमानच्या बहुचर्चित 'राधे'नं केली २३० कोटींची कमाई..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान मागच्या बऱ्याच काळापासून चित्रपटात दिसलेला नाही. मागच्या वर्षी रिलीज होणारा त्याच्या राधे  हा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला पण लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून सलमान या चित्रपटामुळेच सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोरं आलं आहे. एकीकडे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहे आणि दुसरीकडे या चित्रपटानं प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई केली आहे.

सलमान खाननं काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. हा चित्रपट येत्या १३ मे ला रिलीज होणार आहे. पण त्याआधीच चित्रपटानं २३० कोटींची कमाई केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राधे चित्रपटाच्या मेकर्सनी या चित्रपटाचे राइट्स २३० कोटीं रुपयांनी झी स्टुडिओला विकले आहेत. ज्यात सॅटेलाइट, डिजिटल थिएटिकल आणि ओवरसीज राइट्सचा समावेश आहे. या चित्रपटाकडून सलमानला खूप अपेक्षा आहेत.

सलमान खानचा राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई हा बहुचर्चित चित्रपट येत्या १३ मे ला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करु शकतो असा अंदाज लावला जात आहे. सलमाननं आपल्या या बहुचर्चित चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करतानाच त्याचं नवं पोस्टरही शेअर केलं होतं. प्रभूदेवा यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या चित्रपटात दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या