लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:महाविकास
आघाडी सरकारवर सतत ताशेरे ओढणारे
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खा. नारायण राणे यांनी
पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रातील कायदा
सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली
असल्याचे ते म्हणाले. राज्यात जनता सुरक्षित नसून हे सरकार राज्य सांभाळण्यास
सक्षम नाही. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा करण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले आहे. आपण दिल्लीत असतानाच तीन
दिवसांपूर्वीच पत्र लिहून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याचे
राणे म्हणाले.
नारायण राणे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अँटिलिया
स्फोटके प्रकरणात पोलिसांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात असल्याचे सांगत
कोणाला तरी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्यात आज
कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही.
राज्याचा विकास होत नाही, तसेच भ्रष्टाचार देखील वाढलेला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट
लागू करणे आवश्यक असल्याचे राणे म्हणाले.
यावेळी राणे यांनी सचिन वाझे प्रकरणी प्रश्नांची
सरबत्ती केली. सचिन वाझे यांची पोलीस दलात पोस्टिंग कोणी केली?. दिशा सालियन प्रकरणातही वाझे
यांच्याकडे पोस्टिंग कोणी दिली?, पोलिस दलात वाझेंचा गॉडफादर
कोण आहे?..., वाझेंना कोण वाचवत आहे?, असे
राणे यांनी एकावर एक प्रश्न उपस्थित केले. याबाबतची सर्व माहिती उघड झाली पाहिजे,
असेही ते म्हणाले.
सचिन वाझे या शिवसेनेचा आश्रय आहे. म्हणूनच
बेकायदेशीर कामे सुरू आहेत असे राणे म्हणाले. वाझे यांच्याच जीवावर शिवसेना
लोकांना धमक्या देत आहे, असा
गंभीर आरोपही राणे यांनी केला. सचिन वाझे आणि शिवसेना नेत्यांचे संबंध असल्याचेही
राणे म्हणाले.
0 टिप्पण्या