Ticker

6/Breaking/ticker-posts

बॉलिवूडवर करोनाचं संकट: लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या घराला करोनाचा विळखा..


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई- देशभरात करोनाचं संकट आणखी वाढत असून त्याचा प्रभाव बॉलिवूडवर देखील जाणवू लागला आहे. बॉलिवूडमधील रखडलेल्या चित्रपटाचं चित्रीकरण पुन्हा सुरू झालं. पण करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे सगळं पुन्हा बंद होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अनेक कलाकार करोनाची लसही घेत आहेत. रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी यांना करोनाची लागण झाल्यानंतर बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानही करोनाच्या जाळ्यात अडकला. यानंतर लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातही करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्याची माहिती मिळत आहे.

धर्मेंद्र हे काही महिन्यांपासून त्यांच्या लोणावळ्यामधील फार्महाउसवर होते. परंतु सध्या ते मुंबईत परतले आहेत. धर्मेंद्र यांच्या घरात काम करणाऱ्यांपैकी तीन व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्या तिघांना घरात क्वारन्टाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. शिवाय घरातील इतर सदस्यांची देखील काळजी घेण्यात येत आहे. त्या तीन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही विशेष देखरेख करण्यात येत आहे. परंतु, या प्रकारामुळे घरातील सर्व सदस्य काळजीत असून चिंतेचं वातावरण आहे.


यासंबंधी धर्मेंद्र यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटलं, 'ही बातमी खरी आहे. मी करोना लस घेतली असल्याने माझी तब्येत आता ठीक आहे. तरीही मी करोना चाचणी केली आहे. लवकरच त्याचा रिपोट येईल.' बॉलिवूडमध्ये वाढणाऱ्या करोना रुग्णांमुळे चित्रपटसृष्टीवर वाईट परिणाम होताना दिसून आला आहे. देशातील अनेक भागात यापूर्वीच लॉकडाउन लावण्यात आलं असून आता महाराष्ट्रातदेखील पुन्हा लॉकडाउन होणा का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या