Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना : जिल्ह्यात विक्रमी बाधित ..! धोका वाढतोय ..

*आज ६६० रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या १३३८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: जिल्ह्यात आज ६६० रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ०९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७९९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५५ आणि अँटीजेन चाचणीत १७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९४, अकोले ३९, जामखेड २५, कोपरगाव ४५, नगर ग्रामीण २४, नेवासा ०८, पारनेर २०, पाथर्डी १०, राहता ३४, राहुरी ०३, संगमनेर ३१, शेवगाव ४७, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३, अकोले २७, कर्जत ०३, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २२, नेवासा ०५,  पारनेर १२, पाथर्डी ०१, राहाता ९३,  राहुरी १५, संगमनेर ११६, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ५१, कॅन्टोन्मेंट ०७ आणि  इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ४०, अकोले ०८, जामखेड १२, कर्जत १२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०५, नेवासा ११, पारनेर १४, पाथर्डी १९,  राहाता १३, राहुरी ०८, संगमनेर ०१, शेवगाव १६, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा २३८, अकोले १६, जामखेड १२, कर्जत २२, कोपर गाव ३५, नगर ग्रामीण २६, नेवासा ३१, पारनेर १९, पाथर्डी ३१, राहाता ७७, राहुरी २७, संगमनेर ५७, शेवगाव १४,  श्रीगोंदा ०७,  श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १८ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:८२०९६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४७९९*

मृत्यू:११८९*

एकूण रूग्ण संख्या:८८०८४*

स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या