लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नवी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया
सुळे यांनी नवी मुंबईत कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मंचावर मंत्री
जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह
राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी
काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे
यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवारांच्या पावसात
झालेल्या सभेचं गुपित फोडलं.
यावेळी त्या म्ह्नणाल्या “साताऱ्यात पाऊस सुरु होता. त्यामुळे सभा
रद्द करण्याच्या विचार सुरु होता. संध्याकाळच्या सुमारास मला शशिकांत शिंदे यांचा फोन आला. मी प्रचारात होते त्यामुळे
त्यांचा फोन घेतला नाही. नंतर त्यांना फोन केल्यावर ते म्हणले की, ताई मी सॉरी बोलण्यासाठी फोन केला होता. मला प्रश्न पडला की साहेब तर
साताऱ्यात आहेत. मग हे असं का बोलत आहेत.
तेव्हा
त्यांनी सांगितलं की ताई सभा झाली, पवार साहेब पूर्ण
भिजले. मी कपाळाला हातच लावला. मी म्हणलं, अहो असं काय
करताय. माझे वडील 80 वर्षांचे, पायाला
जखम झाली आहे. तेव्हा ते म्हणाले मी आणि साहेबांनी ठरवलं की सभा करायचीच. मग काय
झालं असं विचारल्यावर ते म्हणाले की, काही नाही सभा झाली.
साहेब भिजले. आता साहेब तयार झालेत आणि माझ्या वाढदिवसाचा केक कापतोय. हे सगळं
ऐकून मी पूर्ण शॉक होते”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं चित्र पालटवणारी साताऱ्यातील ती सभा ही शशिकांत
शिंदे यांनी घडवून आणल्याचं आज सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या