Ticker

6/Breaking/ticker-posts

संवेदनशील .. गुरूजी तुम्ही सुद्धा..!


 लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यतील सर्वसामान्य शिक्षकांच्या सुख दु:खात सातत्याने सहभागी होणा-या रावसाहेब रोहोकले गुरूजी यांच्या संवेदनशील स्वभावाचा   अनुभव त्यांच्या समवेत उपस्थित कार्यकर्त्यांना नुकताच नगरमध्ये आला. 

प्रसंग होता, शिक्षक परिषदेचे जिल्हा सहकार्यवाह  सुनिल पवळे सरांच्या मुलीच्या  दुकानाच्या उदघाटनास उपस्थित राहण्याकरिता रोहोकले गुरूजी काही कार्यकर्त्या समवेत जात असताना सायंकाळचे ७ वाजलेले होते. मँक्स केअर हॉस्पीटलपुढे रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी दिसत होती. समोरच एका मोटारसायकलचा अपघात झालेला दिसला. अपघातात वयोवृध्द महिला व तरूण  दोघेही रस्त्यावर पडलेले दिसत होते. बघ्यांची गर्दी झालेली होती. परंतू कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. रोहकले गुरूजींना हे दिसताच त्यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आपल्यासमवेत असलेल्या विकास डावखरेसरांच्या मदतीने अपघात ग्रस्त महिलेला  उचलून घेऊन  दवाखाण्यात दाखल केले. स्वत: हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टराशी संपर्क करत तातडीने वैद्यकिय मदत मिळवून दिली.त्या दोघांवरही पुढील उपचार सुरू झाल्याची खात्री पटल्यानंतरच गुरूजी कार्यक्रमाकडे रवाना झाले. 

एव्हाना गुरुजी हे व्यक्तिमत्व अलीकडील काळात सगळ्यांचे चेस्टेच झालेले आहे. पूर्वीचा आदर राहिला नाही , त्याला कदाचित काळाचा महिमा म्हणावं लागेल. गुरुजींविषयी असणारी आत्मियता रोहकले  गुरूजींच्या संवेदनशीलतेने पुन्हा ए कदा जगविली. त्यामुळे ..गुरुजी तुम्ही सुद्धा.. असे म्हणण्याची वेळ आणि आदरभाव जगविला गेला.  रोहकले  गुरूजींच्या संवेदनशील हळव्या स्वभावामुळे आता अपघातग्रस्तांना लागलीच मदत मिळाल्याचे समाधान  उपस्थित कार्यकर्त्याच्या चेह-यावर जाणवत होते. 

       त्यामुळेच त्यांच्या समवेत असलेल्या रोहोकले प्रणित गुरमाऊली मंडळाचे अध्यक्ष असलेल्या विकास डावखरे यांनी आम्हाला रोहोकले गुरुजींचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान  वाटतो असे गौरवाने सांगितले .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या